खारघर शिवसत्ता टाइम्स (वृषाली शिंदे सुरज गरंडे):-
प्रसिद्ध शोले चित्रपटात जसा धर्मेंद्र म्हणजेच वीरू बसंतीसाठी दारूच्या नशेत उंच पाण्याच्या टाकीवर चढतो तसाच काहीसा प्रसंग खारघर येथे मांगवाल दि. २४ डिसेंबर रोजी घडला… मात्र हा तरुण हाय-टेंशन टॉवरवर चढला होता… नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर ३मधील हि घटना…मंगळवारी या अज्ञात तरुणाने हाय-टेंशन इलेक्ट्रिक टॉवरवर चढून एक तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण दारूच्या नशेत होता. पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीसांच्या जवळपास एक तासांच्या प्रयत्नानंतर हा तरुण खाली आला…त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले…खारघर येथील बेलपाडा आदिवासीवाडीच्या हाय टेंशन टॉवर आहे…दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास या तरुणाने हाय टेन्शन लाईनवरून सुमारे शंभर फूटवर चढण्यास सुरुवात केली…हे पाहून आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी झाली… या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या तरुणाला खाली उतरण्याची विनंती केली. यावेळी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले…तब्बल एक तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता.