मालेगावच्या घोडेगावमध्ये बनावट दारू कारखाना उध्वस्त…70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त:4 जण ताब्यात…

0
50

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे ) :-

नाशिक राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने मनमाड-मालेगाव रस्त्यावरील घोडेगाव शिवारात छापा मारीत बनावट देशी व विदेशी दारूचा कारखाना उध्वस्त  केला… या छाप्यात बनावट दारू बनवायची मशिनरी, विविध कंपनीचे दारूचे लेबल, रिकाम्या बाटल्या, बनावट देशी विदेशी दारूचे बॉक्स, रसायने असा एकूण 70 लाखाचा मुद्देमाल जप्त केला… याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे…. आगामी ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट दारू तयार केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे…
एकतीस डिसेंबरच्या सात दिवस अगोदर ही कारवाई झाल्याने चोर मार्गाने शहरात दारु आणून विक्री करायची हा मोठा हेतू नाशिक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी हाणून पाडल्याने दोन नंबरवाल्यांचे धाबे दणाणले आहेत…