रसायनीत महाविकास आघाडीला खिंडार…असंख्य कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश…

0
54

 रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

खालापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व परिसरातील असंख्य नागरिकांसह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद राईलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटात पक्ष प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला आहे….
रविवार दि.२२ डिसेंबर रोजी पानशील येथे रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिव्य पक्षप्रवेश संपन्न झाला….या पक्ष प्रवेश सोहळ्यात (ऊ.बा.ठा.गटाचे) वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य केदार अनंता भोईर, (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे) सौ.कविता संतोष मांडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद राईलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला असून, यांच्यासमवेत काँग्रेस पक्षाचे रवींद्र जांभळे, (ऊ.बा.ठा.गटाचे) बाबुराव वाघमारे, विल्लम मार्टिस्ट, रवींद्र पाटील, संदेश मांडे, जगदीश मांडे, कैलास तांडेल, शेतकरी कामगार पक्षाचे सुधीर मांडे यांच्यासह काँग्रेस पक्ष, शेकाप, शिवसेना (ऊ.बा.ठा.) (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) गटाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केल्याने वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीपशेठ मुंढे यांचा राजकीय करिष्मा महत्वपूर्ण ठरल्याने संदीप मुंढे हे रसायनी परिसरात किंगमेकर ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे…
राजकारणातील जादुगर अशी ओळख असलेले माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कोकणचे भाग्यविधाते रायगडचे  खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाल्याने मोहोपाडा परिसरात संदीपशेठ मुंढे यांचा राजकीय करिष्मा व वरदहस्त कायम राखला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे… संदीपशेठ यांची वासांबे जिल्हा परिषद वार्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत… वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्ष एक हाती सत्ता प्रस्थापित केली असून, त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या परिसरात विविध विकासकामे मार्गी लागत आहेत…त्यांच्या सुविद्य पत्नी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सौ.उमाताई मुंढे या सुद्धा तळागाळातील गोरगरीब दिन दुबळ्या समाजासाठी अविरतपणे कार्य करीत असल्याने या दांपत्यांचे परिसरात नावलौकिक निर्माण झाले आहे.. .समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ऐंशी टक्के समाजकारण व विस टक्के राजकारण करत समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम ते करत असतात. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात तसेच संदीपशेठ मुंढे व उमाताई मुंढे यांचे कौतुक करत त्यांच्या राजकीय यशस्वी वाटचालीबद्दल तटकरे यांनी प्रशंसा व्यक्त केली.
यावेळी कामगार नेते सुदामशेठ मुंढे,ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ. संगीता भोईर,स्वप्नाली मैदगीऀकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वर्षाताई पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वासांबे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुकुंद जांभळे,पंचायत समिती विभाग प्रमुख वर्षाताई चौधरी,कैलास म्हात्रे, गणेश काळे,उद्योजक हरेश उतेकर,सौ.शारदा काळे,सारीका कांबळे, संतोष पाटील,बबलू मुकादम,प्राचार्य श्री.वारे सर,जयराम पाटील, यांच्यासह बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष बुवा चौधरी यांनी केले…