माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
नाताळ सणाचे औचित्य साधून माणगाव परिसरातील अनेक ख्रिस्ती बांधवांनी मंगळवार दि. 24 डिसेंबरला रात्री एकत्र येत प्रभू येशू ख्रिस्तचा जन्म सोहळा अत्यंत उत्साहत साजरा केला…नाताळ म्हणजे ख्रिस्तीजनांची दिवाळी. येशूचा जन्मदिवस म्हणून हा सण जगभरातल्याप्रमाणेच भारतातही उत्साहात साजरा केला जातो. प्रभू येशूचा जन्म पॅलेस्टाईनमध्ये बेथलेहेम या नगरात झाला. त्याचा जन्म नक्की कोणत्या दिवशी झाला यावर कुठेही एकवाक्यता नाही. मात्र, पूर्वी रोमन साम्राज्यात सूर्यदेवाचा सण २५ डिसेंबरला साजरा केला जाई. त्यामुळे प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्त – जगाचा प्रकाश या अर्थाने त्याच दिवशी ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. नाताळ सणाचा प्रारंभ नाताळच्या पूर्वसंध्येला, म्हणजे २४ डिसेंबरला होतो. त्या दिवशी रात्री १० वाजता वसईतील सर्व ख्रिस्तमंदिरांतून घंटानाद होतो व पुरोहित बाळ येशूच्या सन्मानार्थ प्रभूयज्ञ (होली मास) अर्पण करतात. या धार्मिक विधीसाठी धर्म ग्रामस्थ सहकुटुंब हजर राहतात. हा संपूर्ण विधी मराठीतून संपन्न होतो. या वेळी तबला, पेटी, टाळ-मृदुंगाच्या साथीने नाताळ गौरवगीतांचे सामूहिक गायन होते… येथील मूळची संस्कृती कृषिआधारित असल्याने गुरांचा गोठा, गाई, म्हशी, त्यामध्ये येशू बाळ व त्याची आई मरीया, पिता जोसेफ असा नाताळ देखावा उभारण्याची परंपरा खूप जुनी आहे. गवत, बांबू, माती, शेण अशा सहज उपलब्ध असणाऱ्या व पर्यावरणस्नेही वस्तूंनी हा गोठा तयार केला जातो…मुख्य पुरोहित फादर मेथयू यांनी पूजा पाठ अर्पण करून जमलेल्या ख्रिस्ती बांधवांना बाल येशूच्या जन्म सोहळ्याची कथा सांगितली…नाताळ सणाचे खऱ्या अर्थाने साजरा केला असून जमलेल्या ख्रिस्त भक्तांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. दरम्यानाचा काळात नाथाळ विधी सेवेसाठी अमरदीप संस्थेतील ‘वेदरुणा’,इंदापूर येतील ‘होली स्पिरिट’ तसेच म्हसळा येतील “कॅनोसा” सिस्टर्स यानी अतिशय सुंदर नाताळ सणाचे इंग्लिश, हिंदी आणी मराठी या भाषेत सादर केले तर फादर.अनिल पॉल हे खास पुणे येथून येऊन कॅशियो वाजवून नाताळ सण उत्सवात केला…दरम्यान धार्मिक विधी संपन्न झाल्यावर ख्रिस्मस केक कापून “हॅपी ख्रिस्मसच्या गाण्याचा तालावर आणी “जिंगेल बेल्स, जिंगेल बेल्स, जिंगेल ऑल द वे , गायीचा गोठ्यात ख्रिस्त जन्माला, पूर्वीचा चांदण्याचा तारा उघवला असे सणाचे अनेक भक्ती गीत गावून जोरदार नाच गाण करून उपस्थित ख्रिस्ती भक्त यांनी एकमेकांना नाताळ सणाच्या खास शुभेच्छा देवून सांगता केली…