महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
मुंबई-गोवा महामार्गांवर ज्या ज्या वेळेला अपघात घडले. त्या त्या वेळेला महाड येथील महाशक्ती असोशियशनच्या रुग्णवाहीका तातडीने सतरा मिनिटांच्या आत महाड ते पोलादपूर हा पट्टा पार करीत असतात. अपघातात जखमी असलेल्याना दवाखान्यात नेण्यापर्यंत महाशक्ती असोसिएशन चालक मोलाची भूमिका बजावत असतात. आणि तिथे ही तीच परिस्थिती महाशक्ती रुग्णावाहीका चालक गेले कि एखादा मृत्यू पावलेला व्यक्ती असेल किंवा रुग्ण तरी 102 द्या 108 द्या मग आम्ही काय घोडे मारलेत 17 दुणे 34 किलोमीटर प्रवास आमचा पेट्रोल जातो. आमचं सर्वच आतापर्यंत गेलय…तिथे गेल्यानंतर 102 या रुग्णावाहीका मृत्यू पावलेल्याना नेण्याकरिता देण्यात आल्या आहेत. हेच खरे आमचे दुर्दैव आहे मग महाशक्ती असोसिएशन रुग्णवाहिकेतील चालकानावरच अन्याय का? असा संतप्त सवाल सरकारला विचारला जातोय आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना देखील मायबाप सरकार आमच्याकडे का दुर्लक्ष करीत आहे आमच्या मागणीकडे मायबाप सरकारने आता तरी लक्ष द्यावे अशी भावना महाड येथील महाशक्ती रुग्णवाहिका चालकांनी केली आहे