महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावरील बैलगाडी शर्यत ही कोकणातील सर्वात वेगळी आणि जुनी परंपरा असल्याने ती आजही जोपासली जाते.आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कोकणात अलिबाग समुद्र किनाऱ्यावर या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते… हा शर्यतीचा सामना थरार अनुभवायला हजारों पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते.या बैलगाडी शर्यतीत एकूण 135 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या,तर बैलगाडी शौकिनांनी सुध्दा तितकाच नव्या वर्षात बैलगाडी शर्यतीत उतरून सहभाग घेतला होता. अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुध्दा या शर्यतींचा आनंद लुटला. अलिबागमधील शेतकऱ्यांचा हा पारंपारिक खेळ असाच सुरू राहण्यासाठी अनेक अटी शर्तींचे पालन करूनच या खेळाचे आयोजन केले जाते.असे सुध्दा आमदार महेंद्र दळवी म्हणाले.