पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणच्या पोलीस हद्दीसह इतर विविध सार्वजनिक ठिकाणी रात्री उशीरापर्यंत तृतीयपंथीयांकडून बिनधास्तपणे अश्लील वर्तन करून वेश्या व्यवसायासारखे अनैतिक प्रकार केले जात असल्याने याबाबत स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करून सदर ठिकाणी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे…अनेक ठिकाणी तृतीयपंथी हे अश्लील कृत्य व वेश्या व्यवसाय करीत असताना मिळुन येत आहेत…त्यामध्ये कळंबोली स्टील मार्केट परिसर जेथे ट्रक उभे केले जातात त्या ठिकाणी,आसुडगाव परिसर, सायन-पनवेल महामार्ग, खांदा वसाहत, खारघर परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेलपाडा हायवे, कळंबोली हायवे व ट्रक टर्मीनल येथे उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे सायंकाळनंतर ते रात्री उशीरापर्यंत तृतीयपंथी लोक सार्वजनिक ठिकाणी अतिशय बिभत्सपणे बिनधास्त अश्लील वर्तन, वेश्या व्यवसाय सारखे अनैतिक प्रकार करत असतात. या प्रकारांमुळे त्या परिसराची नाहक बदनामी होत आहे. सदर तृतीयपंथीयांकडुन चालणाऱ्या अनैतिक कृत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे