अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
शिवसेना महिला संघटन अलिबाग उद्यम सखी पुरस्कृत धुंधूर मास जत्रा भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाला सुरवात झाली आहे… उद्य मिता सखी मंच आयोजित शिवसेना महिला संघटन अलिबाग उद्यम सखी पुरस्कृत धुंधूर मास जत्रा भव्य प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन दि.4 व 5 जानेवारी या दरम्यान होत आहे… या सोहोळ्यास उपस्थित राहून अलिबाग मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी शुभेच्छा दिल्या…. यावेळी महिलांच्या उद्योग क्षेत्रातील वाटचालीस आवश्यक ते सहकार्य व योगदान देणार असल्याची ग्वाही आमदार दळवी यांनी दिली.