म्हसळा शिवसत्ता टाइम्स (वैभव कळस):-
म्हसळा येथील कोकण उन्नती मित्रमंडळ मुंबईचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा येथे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” २०२५ हा व्यापक उपक्रम १ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत राबविण्यात येत आहे… या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालय व केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ दिंडी काढण्यात आली… महाविद्यालयीन विद्यार्थ्याना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच भावी उत्कृष्ट लेखक निर्माण करता यावे… मोबाईलच्या जाळ्यात अडकलेले युवा पिढीला वाचनाची गोडी निर्माण होणे आवश्यक आहे… आज ग्रंथ जगतात नव नविन साहित्य उपलब्ध होत आहे… पाठयक्रमांव्यतिरिक्त अन्य पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचायला हवी… यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे… सदर उपक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे, केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल व वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे चेअरमन प्र.एस.माशाळे, पत्रकार अशोक काते, सुनील उमरोठकर, दिलीप करंबे, वाचनालयाचे उपाध्यक्षा अपर्णा ओक, उदय करडे, सायली चोगले महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी पारंपरिक वेशभूषा धारण करून ग्रंथ दिंडीला शोभा आणली…