रेझिंग डे सप्ताह अंतर्गत जंजिरा येथे मोफत आरोग्य शिबीर…शिबिरात सहभागी झालेल्यांना बहुमोलाचे मार्गदर्शन… 

0
39

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत जंजिरा हॉल येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न निहार प्रॉपर्टी अँड लीगल सोल्युशन, लायन्स क्लब श्रीबाग सेन्टेनिअल, स्वरांकिता अकॅडमी, जिल्हा रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, दोस्त मुंबईतील प्रसिद्ध डॉ.जावडे व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या माध्यमातून पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत जंजिरा सभागृह पोलीस मुख्यालय, अलिबाग या ठिकाणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व ऍड निहा अनिस राऊत यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…

या शिबिरामध्ये गर्भाशय कॅन्सर, नेत्ररोग, अस्थिरोग, पोटाचे विकार, रक्त तपासणी यांसह मोफत औषधोपचार करण्यात आले… या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,  डॉ.राहुल शर्मा, ॲडिशनल एसपी, होम डी वाय एस पी, अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे, निहार प्रॉपर्टी अँड लीगल सोल्युशनच्या डॉ.ॲड. नेहा अनिस राऊत, स्वरांकिता अकॅडमीच्या कलाताई पाटील, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ.राजाराम हूलवाल, स्त्री रोग तज्ञ डॉ. मेघा घाटे, सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते… कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली… कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या आरोग्य तपासणी शिबिराला शुभेच्छा देत रेझिंग डे सप्ताहा विषयी माहिती दिली… ॲड.निहा राऊत यांनी देखील या तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना बहुमोल मार्गदर्शन केले… साधारण 200 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.मुंबई येथील सुप्रसिद्ध.. हाडांचे निष्णात सर्जन डॉ.राहुल शर्मा यांनी पोलिसांची मने जिंकली लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या CEO डॉ.शुभदा अणि टीमने नेत्र तपासणी करून मोतीबिंदूचे पेशंटचे ऑपरेशन करण्याची ग्वाही दिली… डेंटिस्ट डॉ.आशिष कोळी यांनी दातांची तपासणी करुन कशी काळजी घ्यावी याबाबत सांगितले… डॉ.निहा राऊत यांनी जे आपले रक्षण करतात त्यांची काळजी घेण्यासाठी शिबिराचे विशेष आयोजन केले… कलाताई यांच्या गाण्याने शिबिराची सुरुवात झाली… डॉ.हुलवान यांनी सर्वांचे आभार मानले…