ट्रामा केअर महाड असुविधेबाबत महाडकरांचा मूक मोर्चा…आरोग्य व्यवस्थेविरोधात आवाज व शासनाला जाग यावी…

0
54

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

2 जानेवारीच्या मध्यरात्री महाड शहरानजिक झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपला जीव गममावा लागला होता, त्यापैकी दोन तरुण हे महाड कुंभार आळी येथील रहिवासी होते… यावेळी ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे त्यांना उपचारार्थ दाखल केले असता त्याठिकाणी तज्ञ डॉक्टर्स, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे ही मुले दगावली असल्याचा आरोप कुंभारआळीतील रहिवाशांसह महाडकर नागरिकांकडून करण्यात येत असून, याबाबत आरोग्य व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी 7 जानेवारी रोजी महाड शहरातून एका मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते…हा मोर्चा महाडच्या ग्रामदैवत वीरेश्वर महाराज मंदिर येथून एमजी रोड मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला…या ठिकाणी मोर्चाचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता प्रांताधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पहावयास मिळाला आणि जबाबदार अधिकारी आल्याशिवाय कार्यालयातून हटणार नसल्याचा निर्धार केला…अखेर डीवायएसपी शंकर काळे आणि पोलादपूर तहसीलदार शिंदे हे या ठिकाणी तातडीने उपस्थित राहिल्यानंतर तहसीलदार शिंदे यांना नागरिकांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले आणि महाड ग्रामीण रुग्णालय ड्रामा केअर सेंटर यांच्या दुरावस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची जाहीर मीटिंग आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली…लवकरात लवकर ही मीटिंग आयोजित केली जाईल,असे आश्वासन तहसीलदारांमार्फत देण्यात आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या मोर्चाची सांगता केली…