धक्कदायक…११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार… अत्याचार करणाऱ्या आरोपी तेजससह दोघा भावांना अटक…

0
43

 रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत… अशातच रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यांतून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे…रोहा तालुक्यातील वरसे येथील 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे…याबाबत रोहा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे…या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे…दि.३० डिसेंबर २०२४ रोजी वरसे गावातील पीडिता आपल्या घराशेजारी सायकल चालवत असताना घराच्या बाजूला राहणाऱ्या तेजस पडवळने तिला घरात बोलावले…घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या पीडितेवर अत्याचार केले…याबाबत कोणालाही सांगितल्यास तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन अशी धमकी दिली…असे प्रकार तेजस पडवळने याआधी देखील केले असल्याची माहिती समोर आली…यानंतर पीडितेने घाबरून घडलेला सर्व प्रकार तिच्या काकीला सांगितला…ही बाब तिच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांना मोठा धक्का बसला… मुलीच्या कुटुंबीयांनी घडलेला प्रकार पडवळ कुटुंबियाला जाब विचारला असता पडवळ कुटुंबियांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली…यानंतर पीडितेचे कुटुंब रोहा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जात असताना तेजस पडवळ व त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना वाटेतच थांबवून शिवीगाळ करून त्यांच्या गाडीचेही नुकसान केले असल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे…या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली असून सदर खटला फास्टट्रॅक वर चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा… व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी… अशी मागणी करण्यात आली आहे… या घटनेने महाराष्ट्रात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे…