डंपरची मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक… धडकेत मोटारसायकलस्वार आयान गंभीर जखमी…

0
69

 उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):- 

उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झालाय…डंपरने मोटारसायकल स्वाराला जबरदस्त धडक दिली असल्याची माहित समोर आली आहे…यात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे…याबाबत सविस्तर माहिती अशी की, उरण तालुक्यातील जासई उड्डाण पुलावर शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान डंपरने मोटारसायकल स्वाराला जोरदार धडक दिली आहे…त्यात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे…उड्डाण पुलावरून जाणाऱ्या वाहनातील प्रवाशांकडून तात्काळ मदत मिळाली असून मोटारसायकलस्वाराला उलवे नोड येथील हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले आहे… सदर मोटारसायकलस्वाराचे नाव आयान नेरेकर असून तो  एसआईएस नेरुळ कॉलेजचा विद्यार्थी आहे… घटनास्थळी तात्काळ उरण वाहतूक पोलीस व वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे दाखल झाले असून पुढील तपास उरण पोलीस स्टेशन करीत आहे…