दापोली-खेड-मंडणगडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ…लवकरच काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता…

0
52

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेडमधील मनसेचे माजी नगरसेवक तसेच काही नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन संघटनावाढीकडे लक्ष दिले आहे. ठाकरे गटाचे उपनेते व माजी आमदार राजन साळवी हे शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागतच होईल असे सांगत पुढे म्हणाले की एवढेच नाही तर महाविकास आघाडीतील काही पराभूत उमेदवार आता महायुतीच्या संपर्कात असल्याचेही मोठे सुचक वक्तव्य योगेश कदम यांनी केले आहे. त्यामुळे आणखी काही दादा, भाऊ महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुक दरम्यान रामदास कदम आणि योगेश कदम यांनी असे सांगितले की, पुर्वाश्रमीच्या मूळ शिवसेनेत असलेले माजी विधानसभा क्षेत्राध्यक्ष व दापोली पंचायत समितीचे माजी सभापती श्री. किशोर देसाई यांना शिवसेनेत प्रवेश देऊन सक्रीय केल्याने शिवसेनेला एक संघटनात्मक पातळीवर बळ मिळाले आहे. लवकरच आणखीही काही घडामोडींची शक्यता आहे.