रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पाली-खोपोली राज्य महामार्गावर अपघाताची मालिका कायम सुरूच असतानाच या महामार्गावर पहाटे चार वाजता खोपोली बाजूकडून जांभूळपाडा घोडपापड या बाजूला जात असताना रिक्षाचा अपघात झाला असल्याची घटना घडली आहे…या अपघातात दोघांचा मृत्यू झाला…रामदास ज्ञानेश्वर घोगरकर व अजित हरीचंद्र वाघमारे अशी मृतांची नावे आहेत…तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला…या अपघाती दुर्घटनेने घोडपापड गावावर शोककळा पसरलीय…रिक्षाचा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही…मात्र नातेवाईकांनी रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक देऊन रिक्षाचा चुराडा झाला असल्याचे म्हटले आहे…या घटनेबाबत पोलिसांनी अपघाताचा योग्य तो तपास करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे….