ताराराणी ब्रिगेडचा जिजाऊ पुरस्कार यंदा कांचन जाधव यांना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान… 

0
47

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):-   

          शिवरायांचा इतिहास जिवंत रहावा आणि हा इतिहास पुढच्या पिढीला कळावा याकरिता सातत्याने कृतीतून नेहमीच प्रयत्नशील असलेल्या अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित ताराराणी ब्रिगेडकडून यंदाचा जिजाऊ पुरस्कार हा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कांचन जाधव यांना मिळाला…मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मासाहेब जिजाऊ यांच्या आजच्या 426 व्या जयंतीला ताराराणी ब्रिगेडकडून विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी हा पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी अनेक शिवकन्या आणि शिवभक्त पाचाड येथील मासाहेब जिजाऊ यांच्या समाधी स्थळावर उपस्थित होते. या पुरस्कार  प्रसंगी ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना ताई मोरे उपाध्यक्षा कविता खोपकर प्रदेशाध्यक्ष मेघा मोरे रायगड जिल्हा अध्यक्षा वर्षा मोरे उपस्थित होत्या…