माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र तथा कोकणाचे बलाढ्य काँग्रेस नेते राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजा भाऊ ठाकूर यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला… या जन्मदिनाचे औचित्य साधून काँग्रेस कार्यकर्ते यांनी ठीक ठिकाणी बॅनर्स लावून जोरदार शुभेच्छा दिलेल्या पाहायलामिळत आहे… दरम्यान राज्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राजा भाऊ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त पुस्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या… राजा भाऊ ठाकूर हे काँग्रेस पक्षाचे विशेष करुन कोकणातील एक दिग्गज नेते म्हणून मानले जातात… त्यांचे वडील कै.मधुकर ठाकूर हे काँग्रेस पक्षाचे आमदार राहिले होते… तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजा भाऊ हे काँग्रेस पक्षामार्फत लोकांची सेवा करत आले आहेत… काँग्रेस पक्ष वाढीसाठी तसेच जिवंत ठेवण्यासाठी राजा भाऊ यांनी कोकणात सक्रिय राजकारणात राहून काम करत आहे… दिवसेंदिवस हजारो कार्यकर्त्यांची वाढ होत आहे… दरम्यान राजा भाऊ ठाकूर काँग्रेस नेते आणि पक्षाचे काम म्हणून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतही विशेष निरीक्षक म्हणून केलेल्या कामाची छाप समोर आली होते… या दरम्यान वाढदिवसाच्या दिवशी अर्थातच नऊ जानेवारी 2025 रोजी शिर्डी येथील साईबाबा मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले होते आणी या नंतर संगमेश्वर येते बाळासाहेब थोरात यांचा निवास्थानी त्यांचे सदिच्छा भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या… तसेच कोकणातील विशेष करुन दक्षिण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव तसेच उत्तर रायगड येथील पेण, अलिबाग तालुक्यातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक त्याचबरोबर राजाभाऊ यांना मानणारा काही वैयक्तिक लोकही वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर लावल्याचेही निदर्शनास आली आहे…. या दरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील कुरवडे बौधजण मंडळ, कुरवडे, सायगाव, आराठी ग्रामस्थ मंडळ, काळींजे ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ कुणबी आळी, बौध्द सेवा संघ निगडी (गालसुरे जाकमाता स्थानिक) तसेच सक्रिय कार्यकर्ते सतेज मारुती जाधव, म्हसळा येथील काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते, माणगावमधील पदाधिकारी, पेण येथील कार्यकर्ते त्याचबरोबर अलिबाग मधील पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्यांसह अनेकांनी राजा भाऊ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बॅनर लावून जोरदार शुभेच्छा दिल्या…
Home महाराष्ट्र काँग्रेस नेते राजा भाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या बॅनर लावून जोरदार शुभेच्छा…