आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुंबईत… तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण…

0
42
DCIM/857MEDIA/DJI_4402.JPG

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवणाऱ्या तिनं युद्ध नौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज बुधवारी मुंबईत येत आहेत.दरम्यान मोदी महायुतीच्या सर्व आमदारांचा क्लासही घेणार अशी चर्चा आहे. दोन तासांच्या भेटीत मोदी सर्वांशीच संवाद साधणार आहेत. त्यामुळे मंत्री व आमदारांना उपस्थित राहण्याचे फर्मान आहे. गेल्या ५ डिसेंबर रोजी मोदी मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला आले होते त्यानंतर ते आता येत आहेत.मुंबईत नौदल गोदीत स. १०.३० वा. त्यांच्या हस्ते आय एन एस निलगिरी, आय एन एस सुरत व आय एन एस वाघशीर या तिन युद्ध नौकांचे राष्टार्पण होईल. त्यानंतर नौदल गोदीतच  महायुतीच्या मंत्री व आमदारांना ते मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आदी या समयी उपस्थित असतील. यावेळी सर्वांसाठी जेवणाचाही खास बेत आखला गेला आहे. मंत्री व आमदारांना मोदी काय कानमंत्र देणार याची सर्वत्र उत्सुकता आहे.दुपारी २:३० वाजता खारघर येथील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनही होणार आहे.मोदीबरोबर त्यांच्या यांच्याशिवाय इतर कोणत्याही वाहनास नौदल गोदीत मज्जाव आहे. मोदींच्या भेटीमुळे दक्षिण मुंबईत होणारी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आमदारांना देखील त्या परिसरात आपापली वाहने घेऊन जाता येणार नाही. त्यांच्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध असेलभोजनाच्या वेळीही कोणाला मोबाईल घेऊन जाता येणार नाही, तर आपापले मोबाईल गेट वरच जमा करण्याची ताकीद दिली गेली आहे…