पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या शुभहस्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबचे उद्घाटन…

0
1

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील नामवंत असलेल्या बिर्ला कार्बन इंडिया प्रा.लि. यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबचा उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती. आंचल दलाल यांच्या शुभहस्ते व  बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड श्री.रवींद्र कुमार रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर  शाळेत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.उद्घाटन प्रसंगी शाळेच्या प्रवेशद्वारात प्रमुख अतिथी व सर्व मान्यवरांचे आगमन होत असताना आर.एस.पी.च्या शालेय विद्यार्थ्यांनी संचालनातून मानवंदना दिली.त्यानंतर प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते नामफलकाचे अनावरण फित कापून करण्यात आले. तसेच गणेश पूजन व दीपप्रज्वलन करून ए.आय.लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर आदित्य वंदना तसेच संगीत विभागाच्या सौ. म्हात्रे मॅडम व विद्यार्थ्यांनी “मन की वीणा से गुंजित ध्वनी मंगलम” हे सुमधुर स्वागतगीत सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन  यथोचित स्वागत करण्यात आले.ए आय लॅबचे मुख्य मार्गदर्शक श्री प्रताप पवार यांनी ए आय संदर्भात संपूर्ण माहिती सांगत विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे हे आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले.प्रमुख अतिथींचा परिचय  मयुरी शिरोडकर यांनी करून दिला. परिचय करून देत असताना त्यांनी सांगितले की,आंचल दलाल मॅडम यांनी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे २२ मे २०२५ हाती घेतली.त्या रायगड जिल्ह्याच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक म्हणून नेतृत्व करत आहेत
त्याआधी यांनी सातारा जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक पदावर काम केले आहे.शासन,कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे,अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे.
त्यांनी “लेडी सिंघम” अशी उपाधि देखील मिळवली आहे. म्हणजेच लोकांच्या मनात त्या धाडसी आणि कार्यक्षम अधिकारी आहेत.
सन्मा.आंचल दलाल मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना म्हणाल्या की,शाळेत प्रवेश करताना आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी संचलनातून दिलेली मानवंदना कौतुकास्पद होती. तसेच बिर्ला कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबमुळे चौक व परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यातून निश्चितच विद्यार्थी शिकतील व त्यांना या क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळेल.या ए.आय.लॅबमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे चौक परिसरातील शैक्षणिक वातावरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जात आहे.
समारंभाचे अध्यक्ष तथा युनिट हेड श्री. रवींद्रकुमार रघुवंशी यांनी अध्यक्षीय मनोगतात बिर्ला कंपनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात तसेच गाव आणि आदिवासी भागात सातत्याने करत असलेल्या कार्याची माहिती दिली.याप्रसंगी खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहुल,संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाश देशमुख,चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे,बिर्ला कार्बन कंपनीचे एच आर हेड श्री निखिल भांबरे,सेफ्टी मॅनेजर सुरेंद्र घोगरे,संस्थेचे उपकार्याध्यक्ष नरेंद्र भाई शहा सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा,सी.एस.आर. प्रमुख श्री.लक्ष्मण मोरे, खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे,अभियांत्रिकी विभाग प्रमुख पूर्णेद्रोकुमार,संदीप कुमार,हरेश रावत,प्रशांत गायकवाड, रसायनी टाइम्सचे संपादक अनिल भोळे,पत्रकार आनंद पवार,अर्जुन कदम,बी.एस.कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिलीप मोळीक सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री.अनिल बडेकर व मयुरी शिरोडकर यांनी केले.