पनवेल हादरलं…सख्ख्या भावानेच केली सख्ख्या भावाची हत्या… अनैतिक संबंधाच्या कारणावरून झालेला वाद गेला टोकाला…  

0
3

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

सख्ख्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना करंजाडे येथे 25 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली.या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपी नागेश वाल्या काळे (राहणार टाटा पॉवरच्या पाठीमागील झोपडपट्टी, साईनगर, करंजाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 25 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान करंजाडे सेक्टर 5 मधील तळ्याच्या काठी नागेश वाल्या काळे याने मृत दत्तू वाल्या काळे याला एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून झालेला वादातून त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. यात दत्तू वाल्या काळे हा गंभीर जखमी झाला.आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.