मंत्री अदिती तटकरेंकडे रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी… रोह्यात फटाके आणि घोषणांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्सव साजरा…

0
117

रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):- 

महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी निवडणुका पार पडल्या आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले.अनेकांना मंत्री पद सुद्धा देण्यात आली परंतु महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीचा तेढ कायम होता. रायगडातून एकीकडे शिवसेनेचे नेते मंत्री श्री भरत गोगावले हे दावा करत होते…तर एकीकडे राष्ट्रवादीतुन मंत्री अदिती तटकरेंना पुन्हा पालकमंत्री मिळावं या साठी हट्ट कायम होता…अखेर काल पालकमंत्री पदाच कोड सुटलं आणि पालकमंत्री पदाची माळ पुन्हा मंत्री अदिती तटकरे यांच्या गळ्यात पडली…एकीकडे गोगावले गटाचे कार्यकर्ते नाराज असले तरी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवत आणि एकमेकांना पेढा भरवत जल्लोष साजरा करण्यात आला… त्यांच्या निवडीने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. रोह्यात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष केला. महिलांसाठी हा निर्णय प्रेरणादायक ठरल्याचे मत महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.अदिती तटकरे यांच्या निवडीनंतर रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी “अदिती तटकरे जिंदाबाद” आणि “रायगडचा विकास होणारच” अशा घोषणा दिल्या. फटाके उडवत, मिठाई वाटून समर्थकांनी आनंद व्यक्त केला. महिलांसाठी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे महिला कार्यकर्त्या म्हणाल्या. “अदिती ताईंनी महिलांसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांना पालकमंत्रीपद दिल्याने महिलांना न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे,” असे रोह्यातील राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या शांता काळे यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “रायगड जिल्ह्यातील विकास कामांना आता अधिक गती मिळेल. अदिती तटकरे यांचे नेतृत्व मजबूत आहे आणि त्यांचे विकासाच्या मुद्द्यांवरील काम सर्वश्रुत आहे. त्यांच्या पालकमंत्रीपदामुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि उद्योगक्षेत्राला चालना मिळेल.ज्येष्ठ राष्ट्रवादी कार्यकर्ते नंदूशेठ म्हात्रे यांनी अदिती तटकरे यांची निवड होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आणि अजित पवार यांचे आभार मानले. “हा निर्णय फक्त राष्ट्रवादी काँग्रेससाठी नाही, तर रायगडच्या प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे,” असे म्हात्रे यांनी सांगितले.रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे यांची निवड हा महिलांसाठी प्रेरणादायी निर्णय मानला जात आहे. त्यांचे नेतृत्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर, नेते विजयराव मोरे, गटनेते महेंद्र गुजर,रोहिदास पाशीलकर, राजूशेठ पोकळे , माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर,सरपंच अमित मोहिते  युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंडे,संतोष भोईर, अनंत देशमुख, मयूर पायगुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते… अदिती तटकरे यांच्या निवडीने रायगड जिल्ह्यात विकासाची नवी दिशा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोह्यात झालेला जल्लोष त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. आता जिल्ह्यातील पायाभूत विकास, महिला सक्षमीकरण, आणि औद्योगिक प्रगतीला नवा वेग मिळेल, अशी आशा सर्वत्र आहे.