माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यांपासून ते हे नवीन वर्ष 2025 उजाडून तीन आठवडे होत आले आहेत… माणगाव शहरातील अनेक वॉर्डमध्ये दिननित्य घर कचरा नगर पंचायत मार्फत उचल करण्याचा विषय सध्या ऐरणीवर दिसत आहे…. याबाबत अधिक माहिती अशी आहे की, स्वछता ठेवण्याचे काम नगर पंचायतचे महत्वाची जबाबदारी आहे…. तर सदर मोहीम करीता न.पं. ठेकेदार यांना नेमून घर कचरा उचल करण्याकरीता नेमलेले आहे… मात्र गेल्या वर्षाची डिसेंबर महिन्यापासून अनेकवेळा कचरा उचल करण्यासाठी येत असलेल्या घन्टा गाडी वेळेत न येणे त्याचबरोबर काही दिवस आड येणे अशी होती… आता तीच अवस्था नव्या वर्षातही दिसून येत आहे… दरम्यान या समस्या बाबत सिटी-को-ओर्डीनेटर अतुल जाधव यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी ठेकेदार यांच्याकडे संपर्क साधून आपण याबाबत कचरा उचल करण्यासाठी काय समस्या आहे ती जाणून घेण्यासाठी पाहतो असे उत्तर दिले… मात्र कचरा गाडीची कचरा उचल करण्याची अनियमितता तसेच काही दिवस आड कचरा उचल करण्याचा समस्या अजूनही तीच परिस्थिती राहिली आहे… दुसरीकडे ठेकेदार कधी कर्मचाऱ्याकडे बोट दाखवतो तर कधी वाहन नादुरुस्त तर कधी वाहन कमी असल्याची कारणे देत पुढे सर्व सुरळीत होईल असे संपर्क केल्यावर सांगितले जाते… तसेच यापुढे वेळेत आणि नित्य कचरा उचल होतीलहोईल असे सांगितले जाते… मात्र काही दिवसांनी ‘येरे माझ्या मागलल्या’ अशी अवस्था कचरा उचल बाबतीत पुन्हा सुरु झालेले पाहायला मिळत आहे… तर माणगाव नगर पंचायतचे स्वच्छता विभाग या समस्याबाबत काना डोळा करीत असल्याचे सरळ सरळ दिसत आहे… वॉर्ड क्र. 16 खांदाड येथील काही अंतरावर गेली तीन दिवस घन्टा गाडी फिरकलीच नाही… त्यामुळे कचरा साठून राहिल्याने दुर्गंधी वाढली आहे…याबाबत संबधित विभाग तसेच ठेकेदार यांना “व्हाट्सअप” द्वारे आमच्या प्रतिनिधीने माहिती कळविली आहे… दरम्यान वॉर्ड क्र. 02 येथे ही तीच परिस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे…. याचा सरळ सरळ अर्थ असा होत आहे की, अनेक वॉर्डमध्ये हीच परिस्थिती दिसून येत आहे… कहर बाब म्हणजे रविवारी दि.19 रोजी निजामपूर रोड, काळवा जवळ साईनगर पूर्व भागात वॉर्ड क्र. 02 येथील भागात सामाजिक कार्यकर्ते ऍड.पंकज खामगावकर यांनी बोलताना निदर्शनास आणून दिले आहे की, सदर दिवशी दीड तास कचरा गाडी त्या भागात उभी होती, मात्र चालक नव्हता आणि काही तासांनी गाडी कचरा उचल न करता निघून गेली तसेच आवाज देऊन सुद्धा तो थांबला नाही… दरम्यान पंकज खामगावकर यांनी बोलताना एक धक्कादायक माहिती दिले की, असे निदर्शनास आले की, जो पैसे देतो त्यांचा कचरा उचल घन्टा गाडी कामगार घेऊन जातात.. याबाबत मी स्वतः नगर पं. यांना लेखी नोटीसद्वारे अश्या कर्मचारी तसेच ठेकेदार यांच्यावर कारवाई करा… तसेच अशीच परिस्थिती राहिली तर थेट न.पंचायत कार्यालयात नागरिक कचरा पेटी घेऊन तिथे जमा करणार असल्याचे शेवटी सांगितले आहे… यादरम्यान आज सोमवारी दि.20 रोजी ही सकाळच्या वेळेत वॉर्ड क्र. 02 येथे कचरा गाडी येऊन गेली पण येथील कचरा गोळा न करता निघून गेल्याची बाब समजली आहे… तसेच माणगाव बाजार पेठेत न चुकता विशेष करुन मोर्बा रोड येथील भागात सायंकाळी उशिरा तसेच रात्री आठ ते 09:00 च्या दरम्यान कचरा उचलची चोख काम बजावले जात आहे… मग वॉर्डमधील रहिवासी भागात कचरा उचलची अनियमितता का ? असा प्रश्न आहे… दरम्यान मागच्या आठवड्या पासून माणगाव नगर पंचायत स्वछता मोहीम बाबत जनजागृती करीत आहे की “सुका तसेच ओला कचऱ्याचे विलगीकरण करुन देण्यात यावे, अन्यथा कचरा स्वीकारला जाणार नाही अशी दवंडीद्वारे न.पं.देत आहे… मात्र कृतीने स्वछता बाबत सुस्ती दिसत असल्याने सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे की “देखो देखो माणगाव नगर पंचायत खुद्द बीमारी फैला रही है.”