बिरवाडी शहरातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का… शहराध्यक्ष सह ग्रामपंचायत सदस्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश…

0
42

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

बिरवाडी शहरातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का मिळाला असून बिरवाडी शहराध्यक्षसह ग्रामपंचायत सदस्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला आहे…विधानसभा निवडणुकीपूर्वी व विधानसभा निवडणुकीनंतर देखील आमदार भरतशेठ गोगावले यांचा करिष्मा पुन्हा पाहायला मिळत आहे…उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हनुमंत जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून सचिन बागडे व शकील माटवणकर यांची ओळख आहे… मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे ग्रामपंचायत सदस्य सचिन बागडे व शकील माटवणकर यांनी शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला…उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पद नसल्यामुळे विकास काम होत नाहीत… त्यामुळे बिरवाडीतील विकास खुंटला असून बिरवाडीतील विकास काम हाती घेऊन आणि नामदार गोगावले यांच्या विकास कामांचा झंजावत पाहून मी आणि माझे सहकारी शिंदे गटांमध्ये प्रवेश करीत असल्याचे सचिन बागडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. सचिन बागडे व शकील माटवणकर यांच्या प्रवेशावेळी नामदार भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे ,युवासेना कोर कमिटी विकास गोगावले, शेखर राखाडे, योगेश साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरच बिरवाडी शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.