प्रजासत्ताक दिनाच्या परेड सोहळ्यास पोमेंड-बुद्रुक ग्रामपंचायतीला मानांकन… शासनाच्या योजना लोकाभिमुख करण्यात अग्रेसर म्हणून लाभला सन्मान… 

0
68

रत्नागिरी शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-    

केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख People Oriented योजना जनतेपर्यंत पोहचवणाऱ्या काही ग्रामपंचायतींची निवड या उपक्रमासाठी Initiative करण्यात आली होती…त्यांच्याकडून यासाठी माहिती मागविण्यात आली होती…पंतप्रधान घरकुल PM Aawas Yojana योजना,उज्वला गॅस योजना,रमाई घरकुल योजना,लाडकी बहिण योजना,आदी विविध योजना, उपक्रम गावात पूर्ण क्षमतेने राबवून त्याचा लाभ नागरिकांना Citizens देण्यात आला आहे.  हे उपक्रम ग्रामपंचायतीं मार्फत नेटाने राबविण्यात येत असतात यामुळेच  ग्रामपंचायतींना हा बहुमान मिळाला आहे.मात्र यात यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंड-बुद्रुक ही ग्रामपंचायत अग्रेसर ठरल्याने तेथील महिला सरपंच श्रीमती ममता जोशी यांना दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेड सोहळ्यास उपस्थित राहण्याचा बहुमान देण्यात आला आहे.प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचे स्वप्न अनेकांना असते. मात्र हे सर्वांनाच शक्य होत नाही.आता या परेडला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मोठा मान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सरपंचाना मिळणार आहे.यंदा हा मान कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंड-बुद्रुक कारवांची वाडी येथील महिला सरपंच श्रीमती ममता जोशी यांना मिळाला आहे.प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचे स्वप्न अनेकांना असते. मात्र हे सर्वांनाच शक्य होत नाही…आता या परेडला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मोठा मान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सरपंचाना मिळणार आहे. यंदा हा मान कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंड-बुद्रुक कारवांची वाडी येथील महिला सरपंच श्रीमती ममता जोशी यांना मिळाला आहे.