रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे… 11 वाजले तरी रुग्णालयात OPD डॉक्टर उपलब्ध नाही… यामुळे नागरिकांसह रुग्णांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत आहे… रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्याशी याबाबत विचारपूस करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्याची खुर्ची सुद्धा रिकामीच पाहायला मिळाली… यामुळे रुग्णांचा नक्की वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित होतो… यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केले असता त्यांनी सुद्धा पत्रकारांच्या कॉल न उचलता दुर्लक्ष केलेले पाहायला मिळाले… विशेष म्हणजे हा मतदारसंघ मंत्री अदिती तटकरे यांचा असून खासदार तटकरेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच ठिकाणी आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे… हि खरी तर लाजिरवाणी बाब असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे… रायगडमध्ये सध्या सर्वच राजकीय नेते हे पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच करतांना व्यस्त आहेत… अश्या परिस्थितीत नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष नक्की कोण देणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे…