सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात उपोषण सुरू… नागेश देशमुख यांचे सरपंच सुनील देशमुख यांच्यावर गंभीर आरोप…

0
38

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड एमआयडीसीतील बिर्ला कंपनीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यापूर्वी सरपंच सुनील देशमुख यांच्या समवेत प्रकल्पग्रस्त कमिटी यांनी एकत्रित बसून हा वाद संपवला होता. मात्र या वादाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागले असून आज नागेश देशमुख यांनी सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा पहिलाच दिवस सुरू असताना नागेश देशमुख यांनी सरपंच सुनील देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी बेमुदत उपोषणावर ठाम राहणार असल्याचे नागेश देशमुख यांनी यापुढे बोलताना सांगितले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता कांबळे तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत कार्यालय बाहेर उपोषणा स्थळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.