58 व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ… भव्य शोभायात्रेत सांस्कृतिक एकतेचा संगम… देश-विदेशातून भाविकांची उपस्थिती…शोभायात्रेत अनेकतेत एकता  

0
74

 पुणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

         महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ भव्य शोभायात्रेने हर्षोल्लासपूर्ण वातावरणात करण्यात आला… सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य उपस्थितीने हा समागम मंगलमय झाला… समागमाच्या उद्घाटनप्रसंगी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, “मनुष्य जन्म घेतल्यावर मानवी गुणांनी युक्त असणे हीच त्याची खरी ओळख ठरते.” त्यांच्या या विचारांनी उपस्थित भाविकांना प्रेरणा मिळाली… या तीन दिवसीय संत समागमात महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे… मिलिटरी डेअरी फार्मच्या विशाल मैदानावर हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे… समागमाच्या सुरुवातीला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले… या शोभायात्रेत निरंकारी मिशनच्या शिकवणींवर आधारित विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारे चित्ररथ सादर करण्यात आले… भाविकांनी हृदयसम्राट सद्गुरुंचे उत्साहाने स्वागत केले, तर शोभायात्रेतील सांस्कृतिक विविधतेचे दृश्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते… समागम स्थळावर आगमन होताच सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे स्वागत समिती सदस्यांनी पुष्पगुच्छ आणि पुष्पमालांनी केले… दिव्य युगुलांना फुलांनी सजवलेल्या वाहनातून मुख्य मंचावर नेण्यात आले… उपस्थित भाविकांनी “धन निरंकार”च्या जयघोषांनी वातावरण आनंदित केले…  सतगुरु माताजींनी भक्तांच्या भावनांचा आदर करून त्यांना आशीर्वाद दिला… संत समागमाचा मुख्य उद्देश मानवतेचा संदेश देऊन एकतेची भावना वृद्धिंगत करणे हा आहे… समागमातील विविध कार्यक्रम, सत्संग आणि सेवाकार्यांमुळे भक्तांमध्ये आत्मिक शांती आणि आनंद निर्माण होत आहे… या समागमाने पिंपरी परिसर भक्तिमय केला असून भाविकांसाठी ही एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती ठरत आहे…