मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-
सागरी किनारा प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे…. सोमवारी २७ जानेवारी पासून या पुलावरून दक्षिण मुंबईतून थेट वांद्रेपर्यंत दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे… त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन आदि भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावरून ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गीकांचे लोकार्पणही यावेळी होणार आहे… मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत खुला राहणार आहे…
Home महाराष्ट्र सागरी किनारा मार्ग होणार पूर्ण क्षमतेने सुरू..वरळी वांद्रे सागरी सेतूचे प्रजासत्ताक दिनी...