रोहा अष्टमी अर्बन बँक कवडीमोलात बिल्डरच्या घशात विकल्याने ठेवीदारांमध्ये संताप…ठेवीदारांच्या आक्रोशाची खासदार सुनील तटकरेंकडून गंभीर दखल…

0
35

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 
रायगड जिल्ह्यातील रोहा वासियांची अस्मिता असलेली रोहे अष्टमी अर्बन बँक कवडीमोल भावाने बिल्डरला विकण्यात येत असून या बँकेतील ठेवीदारांना व भागधारकांना विश्वासात न घेता नियमबाह्य पद्धतीने बिल्डरला विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रोह्यातील सर्व पक्षीय नागरिकांनी आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला. खासदार सुनील तटकरे यांनी नागरिकांच्या आक्रोशाची गंभीर दखल घेत थेट राज्याचे सहकार मंत्री यांना फोन करून या विक्री संदर्भात स्थगिती देण्याची विनंती केली. आक्रोश समितीचे समीर शेडगे, नितीन परब आणि अमित घाग यांनी बॅंक लिलावात झालेल्या अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे…