लोकशाही टिकवण्यासाठी प्रजेचा विचार सोहळा …प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमाता पूजन व संविधान पूजन…

0
33

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल ) :- 

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीषदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पनवेल येथे भारतमाता पूजन आणि संविधान पुजन व घंटानाद करण्यात आला.अनेक ठिकाणी घंटानाद करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली… भारतमाता की जय… संविधानाचा विजय असो… अशा घोषणा देण्यात आल्या… भाजपकडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. हा धोका टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सायंकाळी ऐतिहासिक बिंदू चौकात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ‘संविधान वाचवा’ची हाक देण्यासाठी शिवसैनिकांनी घंटानाद करून सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदिप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, उपमहनगर प्रमुख अच्युत मनोरे, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, खांदाकॉलनी शहर प्रमुख  सदानंद शिर्के, कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, कळंबोली शहर प्रमुख सुर्यकांत म्हसकर, युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, महिला आघाडी उपजिल्हा संघटीका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटीका प्रमिला कुरघुडे, तालुका संघटीका सौ. अनिता डांगरकर, ग्रामीण उपतालुका संघटिका सौ. तनुजा झुरे, उपमहानगर संघटिका सौ. संचिता राणे संघटीका शहर संघटीका अर्चना कुळकर्णी, यांच्या सह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.