नागोठणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पुण्यनगरी व ऐतिहासिक नागोठण्यात जैन धर्माचे आठवे तीर्थंकर श्री चंद्र प्रभू स्वामी यांची अंजन शलाका प्रतिष्ठा प्रशंका भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेय. ऐतिहासिक जैन मंदिराला 150 वर्ष पूर्ण होत असून मंदिराची अंजन शलाका सुरू झाली असून यानिमित्त नागोठण्यात भव्य दिव्य कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडत आहेत.हा महोत्सव सृष्टीतील सर्व जिवांच्या सुख समृद्धी,शांती, प्रगती व भरभराट होण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. या महोत्सवात सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण रायगडवासी,जैन बांधव अनेक संघ, सर्व जाती समाज बांधव सहभागी होत आहेत.