अनिकेत तटकरेच्या उपस्थितीवरून शेकापचे पंडित पाटील यांचा आक्षेप… कालची क्लिप बघितल्यानंतर आश्चर्याचा  धक्का बसलाय: पंडित पाटील…

0
39

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असताना 26 जानेवारीच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमावरूनही नवीन वाद निर्माण झाला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मान आदिती तटकरे यांना मिळाला असला तरी, त्यांच्या सोबत व्यासपीठावर विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहिल्याने शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.अनिकेत तटकरे यांनी प्रोटोकॉलचे पालन केले नाही. मी कालची क्लिप पाहिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला,” असे पंडित पाटील यांनी स्पष्ट केले….

ते पुढे म्हणाले, “पालकमंत्रीपदावरून तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष सुरू असताना शासनाने अनिकेत तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा कोणताही जीआर काढलेला नव्हता. 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी विशिष्ट नियम आणि प्रोटोकॉल असतात, मात्र शासनाचे अधिकारी सत्तेपुढे हतबल झाले आहेत… तटकरे कुटुंब अनेक वर्षांपासून रायगडमध्ये पालकमंत्री आणि मंत्री पदावर आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.