मॅगी पॉईंट येथे तरुणावर जीवघेणा हल्ला; … तीन आरोपीविरोधात लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

0
47

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या लोणावळा येथील मॅगी पॉईंट येथे काही दिवसापूर्वी रुपेश श्रीराम शेलोकर (वय 32, रा. तुगांर्ली, लोणावळा) यांच्यावर एका महिलेसहित तिघांनी चाकूने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी अजय नायडु याने त्याचा भाऊ विजय नायडु व त्याची पत्नी या तिघांनी
तीन आरोपीविरोधात लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे…

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील लोणावळा येथील मॅगी पॉईंट नजिक शनिवारी (18 जानेवारी) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रुपेश शेलोकर नामक एका तरुणावर एका महिलेसहित तिघाकडून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जखमी तरुण रुपेश याने दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

जखमी रुपेश याने दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा पोलिसांनी लोणावळा शहर पोलिसांनी रुपेश शेलोकोर हे मॅगी पॉईंट येथील आकाश येवले यांच्या मॅगी पाँइटच्या स्टॉलवर मँगी खात असताना अजय नायडु हे स्टॉल मालक आकाश येवले याचेबरोबर वाद घालत होते. तेव्हा रुपेश याने अजय नायडु यास भांडने करु नकोस तुला काय खायचे ते खा असे म्हणाला असता त्याचा राग येवून अजय नायडु याने त्याचा भाऊ विजय नायडु व त्याची पत्नी नाव माहीती नाही यांना बोलावून घेवून रुपेशच्या डोक्यात चाकूने वार केले तसेच हातातील काठीने मारहाण करत जखमी केले.या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर केरूळकर हे करत आहेत.