स्मृती मानधनाने रचला इतिहास… वर्ष २०२४ तिच्यासाठी ठरले सर्वोत्कृष्ट…

0
108

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

स्मृती मानधनाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसीचा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला आहे… गेल्या वर्षी एक दिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी आयसीसीने मानधनाचा हा सन्मान दिला… मानधनाने चौथ्यांदा आयसीसी पुरस्कार जिंकला आहे… २०१८ मध्ये तिने पहिल्यांदा हा पराक्रम केला होता…. यानंतर २०२१ मध्ये तिने आयसीसी क्रिकेटर ऑफ दी ईयर हा अवार्ड जिंकला आणि यावेळी तिची वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटर म्हणून झाली… २८ वर्षीय मानधनाने गेल्या वर्षी १३ सामन्यात ७४७ धावा केल्या होत्या… ती २०२४ मधील सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू होती… मानधनाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २९ चेंडूत २९ धावा करत वर्षाची सुरुवात केली होती…. पुढे वनडेसाठी सहा महिने प्रतिक्षा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना मानधना जबरदस्त फॉर्मात होती… यावेळी चार शतकांशिवाय तिनदा अर्धशतकी खेळी पण केली होती… यावेळी तिची १३६ ही सर्वोत्तम धावसंख्या होती…. तिने झळकवलेली चार शतके म्हणजे जो एक आयसीसी वुमन्स वनडे सामन्यातील तिचा जागतिक विक्रम होता… यावेळी तिने तब्बल ९५ चौकार व ६ षटकार मारत धावांची बरसात केली होती… तेव्हा मानधनाने ५७.८६ घ्या सरासरीने आणि ९५.१५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती, ज्यामुळे स्मृती मानधना महिला आयसीसी चॅम्पियन्स शिप स्पर्धेमध्ये स्टार फलंदाज ठरली….