उरण पूर्व भागातील खोपटे गांव अपघात प्रकरणी समेंट… एनएमएमटी  बस अपघात ग्रस्तांना नुकसान भरपाई व नोकरीची हमी…

0
56

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-

        उरण तालुक्यातील खोपटे गांवात गेल्या वर्षी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घडलेल्या एनएमएमटी बस अपघातातील मृत निर्देश शशिकांत म्हात्रे याच्या कुटुंबियांना सुमारे वर्षभराच्या अथक लढाईनंतर न्याय मिळाला आहे… यासाठी प्रयत्न करणाऱ्या निर्देश यांच्या भावाला कुठेच प्रतिसाद मिळत नव्हता, मात्र जिद्द न सोडता कुटुंबियांनी स्थानिक युवा कार्यकर्ता गोरख रामसिंग ठाकूर व माध्यमांच्या साथीने वर्षभर प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर माजी केंद्रीय मंत्री व आगरी समाजाचे नेते कपिल पाटील आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नातून म्हात्रे कुटुंबियांचा योग्य त्या भरपाईचा विषय सामंजस्याने सोडवण्यात आला. याचबरोबर म्हात्रे कुटुंबातील एका सदस्याला नोकरीवर घेण्याची हमी देऊन एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. १ तारखेपासून निलेश म्हात्रे यांच्या बहिणीला एनएमएमटीच्या तुर्भे आगारात नोकरीवर घेण्याचे जाहीरपणे आश्वासन दिले आहे. यामुळे आता या प्रकरणामुळे या भागातील  एनएमएमटी  बस सेवा देखील आता लवकरच पुर्ववत सुरू करण्यात येणार आहे…