निरंकारी सतगुरुंच्या सान्निध्यात 93 जोडपी विवाहबद्ध… साध्या विवाहाचे समाजासमोर आदर्श उदाहरण…

0
40

पुणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

      27 जानेवारी 2025 रोजी संत निरंकारी मिशनच्या 58व्या वार्षिक संत समागमानंतर पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंडवर सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात देशभरातील व विदेशातील 93 जोडपी विवाहबद्ध झाली.सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नवविवाहित जोडप्यांना एकमेकांचा आदर-सन्मान राखत, प्रेम व भक्तीभावाने कर्तव्यांचे पालन करण्याचा आशीर्वाद दिला.  

    या विवाह सोहळ्यात पारंपरिक जयमाला समारंभासोबत “साझा हार” ही निरंकारी मिशनची विशेष परंपरा पाळण्यात आली. तसेच, विवाहानंतर सुमधुर निरंकारी लाव्हा गायन झाले… या सामूहिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा तसेच विदेशातील जोडपी सहभागी झाली होती.यामध्ये अनेक उच्चशिक्षित वधू-वरांनी मोठ्या थाटामाटाच्या विवाहाऐवजी साधेपणाला प्राधान्य दिले आणि समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. या विवाह सोहळ्याने जाती-धर्मभेद विसरून समाजाच्या एकात्मतेचा संदेश दिला. सतगुरुंच्या शिकवणीनुसार प्रेम, श्रद्धा आणि समर्पण यावर आधारित गृहस्थाश्रमाचे महत्त्व यातून अधोरेखित झाले… विवाहानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. हे साधे पण भव्य सोहळे समाजासाठी प्रेरणादायी ठरले.