रोह्यात पहिल्यांदाच महाआरोग्य शिबिराचे आयोजन… रोहा नगरपालिकेत नियोजन बैठक संपन्न…

0
42

रोहा शिवसत्ता टाइम्स (दिप वायडेकर):- 

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, रोहा अष्टमी नगर परिषद, ग्रुप ग्रामपंचायत वरसे, तेरणा स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, रोटरी आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल आणि आजी माजी नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे…रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पहिल्यांदाच सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, रोहा- अष्टमी नगरपरिषद, ग्रुप ग्रामपंचायत वरसे, तेरणा स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर माजी नगरसेवक नगरसेविका, रोटरी अँड रोट्रॅक क्लब ऑफ रोहा सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशा मोफत महाआरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे… यामध्ये हृदयरोग, स्त्रीरोग तज्ञ, जनरल सर्जन, अस्थिरोग, कान, नाक, घसा तज्ञ, कॅन्सर तज्ञ, किडनी तज्ञ, सामान्य आरोग्य तज्ञ अशा स्पेशलिस्ट डॉक्टरांचा समावेश असणार आहे… तपासणी करून जर एखादे विकार आढळल्यास त्याचे पूर्णता पूर्तता करून शस्त्रक्रियेचा आणि उपचाराचा सुद्धा खर्च या शिबिराच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहे… तालुक्यात अशी शिबिर पहिल्यांदाच होत असल्याने तालुक्यात याचे कौतुक केले जात आहे…
आज रोहा नगरपालिका येथे याची नियोजन बैठक संपन्न झाली… यावेळी रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी अजय एडके,  ग्रुप ग्रामपंचायत वरचे सरपंच अमित मोहिते, रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचे अध्यक्ष रामचंद्र नाकती, सरपंच अनंत देशमुख, नगरपालिकेचे माजी नगरसेवक समीर सकपाळ, महेश कोलटकर, महेंद्र गुजर, अशोक धोत्रे, चंद्रकांत पार्टे, स्वप्निल धनावडे आदी पदाधिकारी आणि रोहेकर नागरिक उपस्थित होते…