खारघरचे स्वयंभू आणि जागृत गणोबा मंदिर… माघी गणेशोत्सवानिमित्त भक्तांची मोठी गर्दी…

0
33

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नवी मुंबईतील खारघर परिसरात एकमेव स्वयंभू आणि जागृत गणोबा मंदिर सेक्टर ५ येथे आहे… या मंदिराची महती म्हणजे हे अत्यंत जागृत तसेच भक्तांच्या हाकेला धावणारे गणेशस्थान आहे… स्वयंभू असल्याने या मंदिराला विशेष महत्व आहे…मंदिर उभारण्याचे आणि सेवा करण्याचे काम घरत परिवारातील सदस्य करतात… जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत ,उद्योजक रामकृष्ण घरत यांचे या मंदिरासाठी मोठे योगदान आहे… मंदिरात नेहमी भक्तांची रीघ असते… माघी गणेशोत्सवाला मोठी गर्दी उसळते… आजही शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली होती… गणरायाच्या दर्शनाबरोबर या साऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला… माघी गणेशोत्सवानिमित्त पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांनी गणोबा मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले… यावेळी जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत,उद्योजक रामकृष्ण घरत उपस्थित होते…