अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
भारतात गणेश हा लोकप्रिय देवता असून त्याच्या पूजेशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही… लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत गणेशा हा आपल्याला हवासा वाटतो… भारतात भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अलिबागच्या कुलाबा किल्ल्यातील पुरातन काळातील गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा होत आहे… यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकड आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले… भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून उत्सव समितीतर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे…मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे…