ग्रुप ग्रा.पं.कोळे येथील घोटाळा उघड… निधी आला असूनही येथील विद्यार्थी सुखसोयींपासून वंचित…

0
43

म्हसळा शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):- 

म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या कोळे ग्रामपंचायतमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालंय… या ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळामध्ये  स्वच्छतागृहच नाही, शाळेत मुलांसाठी पंखा सुध्दा नाही… शाळेतील मुलं पाण्याची टाकितले दूषित पाणी पितात… त्यांच्या हक्काचे वॉटर फिल्टर गेल्या 5 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये पडून आहे… या शाळेला बराच निधी आला असताना देखील येथील विद्यार्थ्याना या सुखसोयींपासून वंचित राहावं लागतं आहे…

2018 मध्ये कोळे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच यांना घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी अलिबाग व कोकण आयुक्तांनी अपात्र ठरवले होते… तरी देखील पुढे ही या व्यक्तीला निवडणुक लढवून उपसरपंच कसे करण्यात आले, असा आक्षेप सामाजिक कार्यकर्त्या वृषाली जाधव यांनी उपस्थित केला आहे… त्यामुळे अशा व्यक्तीची पुन्हा सखोल चौकशी करण्यात यावी, असा पवित्रा वृषाली जाधव यांनी घेतला आहे…