रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा शहरातील स्मशानभूमी रस्त्यावर सोमवार दि. ३ रोजी पांढऱ्या रंगाची महिंद्रा मॅक्सिको MH .06. BG. 1365 हा क्रमांक असलेला टेम्पो गुरे निर्दयतेने, क्रूरपणे व क्लेशदायक पद्धतीने दोरखंडाने बांधुन त्यांची चारा पाण्याची व्यवस्था न करता नेत असल्याचे दिसून येताच स्थानिक नागरिक तुषार मोरे, ओंकार उतेकर, तेजस देशमुख, किरण कानडे व राजेश कोल्हटकर यांना चोरटे चोरुन घेऊन जात असल्याचे लक्षात येताच ही गाडी अडवून धरली व तात्काळ घटनेची माहिती रोहा पोलीस स्टेशनमध्ये दिली… रोहा पोलिसांनी तात्काळ या गुरे चोरणाऱ्या चोरट्यांना पकडून त्यांच्यावर प्राणी-छळ प्रतिबंधक अधिनियम कलम अंतर्गत रोहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे…
सदर हकिकत अशी की, आरोपी क्रमांक १) आरीश इरफान आघा, वय वर्षे २८ रा.पेठ मोहल्ला सिद्धार्थ नगर, ता. मुरुड, आरोपी क्रमांक २) जावेद हुसेन दाऊद वालवटकर, वय वर्षे ५८ रा.पैर मोहल्ला, विहुर, ता.मुरुड आरोपी क्रमांक ३) अझरुद्दीन जावेद वोलवटकर, वय वर्ष 25 रा.पैर मोहल्ला, विहुर, ता.मुरुड हे आरोपी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सफेद रंगाच्या मॅजिक टेम्पोमध्ये तांबड्या रंगाचा गोवंश जनावर म्हणजे बैल १५००० किमतीचा व १०,००० किंमतीची तांबड्या-पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेली गोवंशी जनावर म्हणजे गाय व 1 लाख किमतीची एक सफेद रंगाची महिंद्रा मॅक्झिको टेम्पो MH 06. BG1365 हे चोरटे रोहा स्मशानभूमी समोरील रस्त्यावर असल्याचे काही स्थानिक नागरिकांना निदर्शनास आले असता त्यांनी पळवून नेणाऱ्या या चोरट्यांना थांबवून ठेवले… तुषार जनार्दन मोरे, वय वर्षे 44 रा. मोरे आळी या स्थानिकांनी रोहा पोलीस स्टेशनमध्ये या गुरे चोरणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला… त्यानुसार रोहा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन मुक्या प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत 11(1) (a), 11(1) (d),11(1) (e), 11(1)( f), 11(1) (j) या आरोपींच्या विरोधात कलम लावून रोहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (रजिस्टर नंबर 25/ 2025) दाखल करण्यात आला आहे… पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत …