मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे रुपडे पालटणार अशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भीष्म प्रतिज्ञा. के.एस.आर.टी.सी. म्हणजे “कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ” देशातील प्रवाशी सेवा, सुविधा आणि व्यवस्थापन याबाबतीत एक उत्तम उदाहरण मानले जाते….नामदार प्रताप सरनाईक सध्या “परिवहन मंत्री” म्हणून बेलभंडारा उचलताच जनसेवेसाठी सतत “भरारी” घेतांना दिसत आहेत… नुकतीच त्यांनी बंगळूर येथील के.एस.आर.टी.सी.च्या मुख्यालयास भेट दिली,आणि एम.एस.आर.टी.सी. मध्ये लवकरच “कर्नाटक पॅटर्न” विकसित करणार असा जणू ध्यासच घेतला आहे…
सध्याच्या एम.एस.आर.टी.सी.च्या सेवा-सुविधा मध्ये कर्नाटक पॅटर्नने अमुलाग्र बदल घडवून आणणे शक्य होईल आणि याबरोबरच मंडळाच्या व्यवस्थापनात देखील आधुनिकीकरण करून महाराष्ट्रातील प्रवाशी आजपर्यंत अन्य खासगी बस कंपन्यांच्या बसेसकडे वळतात,अशा सर्व प्रवाशांना एम.एस.आर.टी.सी.च्या बसकडे कायम वळवण्याचा मुख्य महत्प्रयास आहे…. माध्यमांशी बोलताना मंत्री महोदयांनी सांगितले की, मी कर्नाटक परिवहन व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आहे… आणि महाराष्ट्रात त्याच धर्तीवर एम.एस.आर.टी.सी. ला नवी संजीवनी देण्याचा मानस आखला आहे…
१) प्रगत तंत्रज्ञानाचा वापर:- यामध्ये प्रवाशांसाठी वाय-फाय सुविधा, ऑनलाईन बुकींग, ई-तिकीट प्रणाली, अचूक वेळापत्रक
२) उच्च गुणवत्तेच्या बसेस:- यानुसार आरामदायी आसन व्यवस्थेसह वातानुकूलित प्रीमियम बस सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असतील
३) प्रादेशिक विभागीय प्रणाली:- याअंतर्गत राज्यात ही सेवा वेगवेगळ्या चार ते पाच विभागात विभाजित करून प्रत्येक विभागाचे नेतृत्व भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी करतील यामुळे सेवेत चांगले नियोजन आणि अंमलबजावणी शक्य होईल…
तर… आशा करुया, लवकरच आपल्या महाराष्ट्रातील एसटी महामंडळ, मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतील “कर्नाटक पॅटर्न” प्रमाणे लवकरच कात टाकेल, आणि एस.टी. प्रवाशांना प्रवासाचा सुखद धक्का लवकरच मिळेल… तुर्तास नामदार प्रताप सरनाईक यांना शुभेच्छा देत म्हणू या… “घे भरारी… !!