उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण शहरातील फणसवाडी येथील सामान्य कुटुंबातील सहा वर्षीय परिधी प्रमोद घरत या चिमुर्डीने दि. ४ जानेवारी रोजी नवा विक्रम केला आहे… जगविख्यात बंदर घारापुरी ते मुंबई, गेटवे ऑफ इंडिया हे सागरी १२ किमी अंतर तीने अवघ्या ६ तास ५ मिनिटात पोहून पार केले आहे… परिधी घरत उरण एज्युकेशन स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून, तिला पोहण्याची आवड आहे… प्रचंड मेहनत आणि जिद्धीच्या जोरावर तिने हा विक्रम केला असून, परिधी घरत हिने कोवळ्या वयातच आपले नाव उज्वल केले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे… तर परिधीने पुढे जाऊन आणखी मोठ्या विक्रमांना गवसणी घालायची असल्याचे म्हटले आहे… तिच्या या विक्रमाची नोंद घेत उरण विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश बालदी यांनी सत्कार करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत… तर तिने केलेल्या विक्रमानंतर शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी परिधी घरत हिला भेटून तिचे कौतुक केले आहे…