रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
जीवनात आई वडील आणि गुरूंचे स्थान खूप उच्च असून त्यांचेच आशीर्वाद तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील असे मौलिक मार्गदर्शन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले… विद्यार्थ्यांना पाया पडायचे असेल तर आई वडील आणि गुरुजनांच्या पडा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
नवीन पनवेल शहरातील पिल्लेज महाविद्यालयामध्ये एलेग्रीया महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले होते… यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने प्रमुख उपस्थिती दर्शवली… यावेळी बोलताना त्यांनी महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले… पिल्लेज महाविद्यालयामध्ये दरवर्षी एलेग्रीया महोत्सवाचे आयोजन शानदार पद्धतीने केले जाते… यावर्षी देखील मोठ्या दिमाखात एलेग्रियाचे आयोजन करण्यात आले होते…
मोठमोठ्या दिग्गज सेलिब्रिटी यावेळी येणार आहेत… पाच फेब्रुवारी रोजी या महोत्सवाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी उपस्थिती दर्शवली… विद्यार्थ्यांनी आपली कला- कौशल्य दाखवत अप्रतिम नृत्य सादर केले… जजेस म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मुलांनी सादर केलेल्या नृत्यांचे तोंडभरून कौतुक केले… यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी अप्सरा आली…. या गाण्यावर अप्रतिम नृत्य देखील सादर केले… यावर्षीचा देखील एलेग्रीया महोत्सव सर्वोत्कृष्ट होईल असे पिल्लई महाविद्यालयाच्या पीआर डॉक्टर निवेदिता श्रेयांश यांचे प्रतिपादन…