दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-
दापोली तालुक्यातील “शिवनारी” येथे यंदा २५ वा रौप्यमहोत्सवी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… या उत्साही माघी गणेशोत्सवाचे आयोजन स्थानिक कार्यकारी “शिवशक्ती गणेश मंडळ व प्रगती महिला मंडळ” यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते…
दरम्यान, स्थानिक वरिष्ठांचा सन्मान व सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते… या रौप्यमहोत्सवी उत्सवास दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघातील लाडके आमदार व राज्यगृहमंत्री नामदार योगेशदादा कदम यांची लक्षणीय उपस्थिती…
यावेळी गेल्या पंचवीस वर्षांपासून मोठ्या श्रद्धेने, भक्तीभावाने निरंतर श्रींची पूजा-अर्चा करणारे श्री. योगेश गणपत चोरगे यांचा मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान व सत्कार केला गेला… यावेळी रौप्यमहोत्सवी माघी गणेशोत्सवाचे मानचिन्ह व स्मृती म्हणून घरोघरी वॉल-क्लॉकचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महिलांमडळाचा हळदी-कुंकू समारंभ आटोपल्यावर रात्री हरीपाठ किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या मंगलसमयाचे औचित्य साधून उपस्थित गृहराज्यमंत्री व स्थानिकांचे लाडके नेते नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते सभागृह भूमिपूजन सोहळा संपन्न झाला…. यावेळी दापोलीचे माजी नगराध्यक्ष श्री. किशोरभाई देसाईं यांच्या सह श्री. निलेश सेठ, माजी पंचायत समिती सदस्य वृषाली खडपकर, विभाग प्रमुख दिनेश जावळे, मोहन सांगणे, विश्वास खांबे आदि मान्यवर तसेच शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ मंडळी व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…