श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-
श्रीवर्धन शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करणारा भव्य असा ‘आदिती महोत्सव ‘ श्रीवर्धन येथील र.ना.राऊत हायस्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता…. महोत्सव स्थळी महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमासह ” जल्लोष नारीशक्तीचा” या सुरेख सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते… तसेच तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री हे या सोहळ्याचे
एक प्रमुख वैशिष्ट्य होते…. या महोत्सवास सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी अनपट यांची लाभलेली उपस्थिती हेही महोत्सवाचे आकर्षण ठरले…
महोत्सवाच्या आयोजनासाठी तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षा सबाफिरफिरे, शहर अध्यक्षा सौ.राजसी मुरकर, जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.प्रविता माने व त्यांच्या सहका-यांनी खूप परिश्रम घेतले… या महोत्सवास श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनीही उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले… तसेच माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, माजी नगरसेवक सुनिल पवार यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या… ‘आपल्या माता भगिनींचे सक्षमीकरण हेच सर्वोत्तम वाण’ हा संदेश देत श्रीवर्धन शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय ठरला….