ए दोस्ती हम कभी नही तोडेंगे… आमदार महेंद्र दळवी,अनिकेत तटकरे, छोटमशेठ एकाच मंचावर…

0
33

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):- 

अलिबागमधील झिराडमध्ये अलिबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य व शानदार आयोजन माजी सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने केलेय…स्पर्धेचे उदघाटन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते…तर बक्षीस समारंभाच्या शेवटच्या दिवशी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी सभापती व मुख्य आयोजक दिलीप भोईर (छोटम शेठ )हे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते…

रायगडात शिवसेना शिंदे गटाचे आमदार पालकमंत्री पदावरून चांगलेच तापले होते…राष्ट्रवादी व शिंदे शिवसेनेत मोठा संघर्ष उफाळून आला होता. आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने राजकीय वातावरण तापले होते, मात्र दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने तटकरे व दळवी एकाच मंचावर आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या , तर छोटम शेठ यांचे तोंडभरून कौतुक करून खेळात आणि राजकारणात सारं काही माफ असते.ए दोस्ती हम्म नही तोडेंगे म्हणत दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ व महेंद्र दळवी यांनी मनोमीलन झाल्याचे स्पष्ट केले.