खानविलकर  मराठी उद्योजकाची उत्तुंग भरारी… पोलादपूरचे आर के हॉटेल आणि व्हीला लयभारी…

0
30

 रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

रायगडसह कोकणातील मनमोहक,निसर्गरम्य पर्यटन व ऐतिहासिक स्थळे जगभरातील पर्यटकांना खुणावत असतात, यामध्ये पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यात महत्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे येथील सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण व मनोरंजक साधने असलेले हॉटेल, रिसॉर्ट व व्हीला. मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर जवळील कोकणचा राजा म्हणून सर्वांचे लक्ष  वेधनारा आर के हॉटेल्स अँड व्हीला साऱ्यांनाच आकर्षित करतोय. आर के बँक्वेस्ट मंगल कार्यालय व व्हीला उभे करण्यासाठी रमेश खानविलकर,व रिद्धेश खानविलकर या मराठी उद्योजकाने हे धाडसी पाऊल टाकलेय .व्यवसाया व्यतिरिक्त आपले धार्मिक रूढी परंपरांचे जतन करण्याचे एक वेगळं ध्येय बाळगून या क्षेत्रात त्यांनी यशस्वी पदार्पण केले. स्वादिष्ट भोजनाची मेजवानी इथं मिळतेच याबरोबरच  सामाजिक , धार्मिक, राजकीय मंगल व इतर कार्यक्रमांसाठी ही  उत्तम व  परिपूर्ण व्यवस्था देणारे हे व्हीला काही आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्या ने सर्वांना आपलस वाटू लागले.