15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत पुन्हा बेमुदत साखळी उपोषण… बेमुदत साखळी उपोषणात रोज 5/10 मुले बसतील…  

0
41

जालना शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

15 फेब्रुवारी पासून अंतरवाली सराटीत पुन्हा बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे. जर वेळ पडली तर पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिलाय. आम्हाला मुंबईत जायचे आहे, शिवाजी पार्क, आझाद मैदान या सारख्या मैदानांची पाहणी करण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहेत. आम्ही 2/3 दिवसात मैदानाच्या पाहणीची तारीख घोषित करू असं देखील जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान, अंतरवाली सराटीत होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणात दररोज 5/10 मुलं बसतील, या साखळी उपोषणाचे लोळ राज्यभरात पसरेल असं देखील जरांगे म्हणालेत.