महापालिकेच्या जागेवर रेल्वेचे अतिक्रमण… अधिकाऱ्यांचे मौन तर कारवाईची प्रतिक्षा…

0
40

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

ओरियन मॉलच्या मागील बाजुस मध्य रेल्वेच्या जागेवर “आरपीएफ बैरेक पनवेल” ही इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीची कुंपणभिंत थेट फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर बांधण्यात आल्याने ये – जा करणाऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते. या इमारतीचे उदघाटन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते येत्या १०-११ फेब्रुवारीला होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र उदघाटनापुर्वीच ही इमारत अतिक्रमणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अधिकारी  उदघाटन करणार की तत्पुर्वी महापालिका कारवाई करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मध्य रेल्वेचे हे कार्यालय बांधण्यात आले आहे. दोन मजली इमारती बाहेर रेल्वेच्या मालकीच्या जागेवर कुंपणभिंत उभारणे गरजेचे होते. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी आपले कुंपण  वाढवत थेट महापालिकेच्या फुटपाथवरच अतिक्रमण केले आहे.मग महापालिकेचा नियम रेल्वेसाठी वेगळा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा आहे का अशी सहज विचारणा होत आहे. या इमारतीच्या उदघाटनाला पोलिस महानिरिक्षकांसह बडे अधिकारी येणार असल्याचे बोलले जाते. मात्र अनधिकृत बांधकाम केलेल्या या इमारतीची फित कापून अधिकारी टिकेचे धनी कसे होउ शकतात ? . जनतेचे सेवक असल्याने त्यांनी आधी या बांधकामाची शहानिशा करणे गरजेचे आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता महापालिकेने तशी नोटिस दिल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र नोटिस नेमकी कशी आणि वाढीव अतिक्रमीत बांधकाम उदघाटना पुर्वी पाडणार की कारवाई होणार?याबाबत महापालिकेचे प्रभाग अधिकारी रुपाली माने, रोशन माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही…